धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव मोठया दिमाखात साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत असुन या अनुषंगाने कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाऊस धाराशिव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व इतर प्रतिष्ठितां समवेत बैठक पार पडली.
17 सप्टेंबरच्या मुख्य कार्यक्रमाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा गृहमंत्री ना.अमित शहा यांना आमंत्रीत करण्याचे ठरले आहे. या निमीत्त जिल्हयात कोण कोणते कार्यक्रम राबवायचे याबाबत सविस्तर चर्चा झाली व जबाबदारी निश्चित करण्याचे ठरले आहे. युवकांना या जाज्वल इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी लहान-लहान व्हिडीओ क्लीप बनविण्यात येणार आहेत. नळदूर्ग येथील प्रस्तावीत स्मारकाबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. बोरी नदी च्या किनार्यावर किल्ल्या लगत स्मारक उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले. सैन्य दलाकडून एक रणगाडयाची प्रतिकृती आणून तेथे ठेवण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. पर्यटकांना आकर्षित करेल असे स्मारक उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी संग्रहालय, स्मृती स्तंभ, पहिले अशोक चक्र पुरस्कार प्राप्त शहीद बचित्तरसिंग यांचा पुतळा, लेजर अँड साऊंड शो करण्यात येणार आहे.
सदरील बैठकीस स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती जिल्हा संयोजक युवराज नळे, प्रा.डॉ. सतीश कदम, साहेबराव घुगे, बलभीमराव मुळे, सुशांत भूमकर, विनायक अहंकारी, प्रमोद पोतदार, मदन पवार, राजेश कारंडे, रवींद्र शिंदे, प्रवीण जगताप, गणेश वाघमारे, विजय बंग, सुरेश शेळके, अरविंद पाटील, सतीश जाधव, महेंद्र बिदरकर, अजित क्षिरसागर, महेश पवार, अक्षय नायगावकर, लक्ष्मण माने, राजेश कुलकर्णी, प्रमोद बचाटे आदी उपस्थित होते.
