तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळीखुर्द ते आरळीब्रु या सात किलोमीटर असणार्या रस्त्याची वाट लागली असुन हे कमी काय म्हणून या रस्त्यावर असणार्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा पुलावरुन गेली अनेक वर्षपासुन अव्याहत पणे मोठे जड, लहान वाहनांची वाहतुक सुरु आहे. या पार्श्वभूमीवर या पुलाचे आँडीट करणे गरजेचे बनले आहे. तुळजापूर तालुक्यातील आरळीब्रु हे गाव बारा ते पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असुन या गावाला आरळीखुर्द हुन जाणारा अरुण ज्योत यांच्या शेताजवळुन जाणारा पुल दहा ते पंधरा वर्षा पुर्वी वाहुन गेल्याचे समजते. त्या नंतर तात्पुरत्या स्वरुपात कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पुलावरुन वाहतुक सुरु करण्यात आली. ती आजही चालुच आहे. सध्या या पुलाजवळ मोठा खड्डा पडला असुन ग्रामस्थांना या पुलालगत साचलेल्या पाण्यातुन ये-जा करावी लागत आहे.
आरळीखुर्द ते आरळीब्रु हा सात किलोमीटर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडुन वाट लागली असुन त्यात कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पुलावरुन मोठी वाहने जात असल्याने हा रस्ता पुल मुत्युचा कुँवा बनल्याचा आरोप ग्रामस्थानं मधुन केला जात आहे. या पुल रस्त्यावरून तुळजापूर नळदुर्ग अणदूर बसवंतवाडी गावाला येजा करणारा आरळीब्रु चा हा मुख्य रस्ता आहे. या रस्ताकडे दुर्लक्षपणा झाल्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. तरी जीवित हानी होण्याच्या आधी हा रस्ता मजबुत करुन नव्याने पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.