धाराशिव (प्रतिनिधी)- हिंगोली- जवळा बाजार येथील उत्तुंगतेज फाउंडेशन द्वारा आयोजित करण्यात आलेल्या उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल दि. 5 जुलै रोजी ुुुर्.ीूील.ळप या संकेत स्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत 5 वी ते 7 वी या गटातून 25 विद्यार्थी तर 8 वी ते 12 वी यातून 25 विद्यार्थ्यांची इस्रो(भारतीय अवकाश संशोधन संस्था), आयआयटी (भारतीय औद्यागिक संस्था) यांसारख्या उच्च संस्थांना अभ्यास दौर्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये असलेल्या संधी ची माहिती व्हावी व शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न बघावी या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली होती. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली. या अ गटातून सत्यम बालासाहेब बेले, द्वितीय संस्कृती सुनील लुगदे, तृतीय सागर दादासाहेब घोडके आणि ब गटातून प्रथम स्वरूप श्यामराव चव्हाण, द्वितीय शुभम संतोष नाईकवाडे, तृतीय सुहाना इम्तियाज नाईकवाडी.
इस्रो अभ्यास दौर्याचे नियोजन ऑगस्ट मध्ये संकेतस्थळावर कळविण्यात येणार आहे व पुढील वर्षीचे परीक्षा प्रवेशासाठी नोंदणी ुुुर्.ीूील.ळप या संकेत स्थळावर दि. 7 जुलै पासून उपलब्ध असणार आहे. अशी माहिती उत्तूंगतेज फाऊंडेशन चे संस्थापक रामेश्वर हालगे यांनी दिली आहे.