तुळजापुर (प्रतिनिधी)- तालुक्यतील आपसिंगा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव  व  हुतात्मा श्रीधर वर्तक यांच्या 98 व्या जयंतीचे औचित्य साधुन हुतात्मा  श्रीधर वर्तक यांच्या स्मारकाला  पुष्पाचक्र अर्पण करुन वृक्षाची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खैरमाटे इतिहास संशोधक प्रा सतिश कदम  तहसिलदार बाळासाहेब बोळंगे सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, नगर परिषद मुख्याधिकारी लक्षमण कुंभार, गणेश जळके, सरपंच अजित क्षिरसागर, उपसरपंच राहुल साठे, ग्रामविस्तार अधिकारी लक्षमण सुरवसे, ग्राम पंचायत सदस्य विजय क्षिरसागर, सचिन जाधव, दीपक थोरात, आमिर  शेख. व आपसिंग ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर आपसिंगा  विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य आदी  व गावातील ग्रामस्थ व युवक ठिकाणी उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक विजय क्षीरसागर यांनी केले.

 
Top