तुळजापूर (प्रतिनिधी)-भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील विद्यार्थी कु. तनिष्का संदीप मगर तिचे प्रमाणपत्र देऊन कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
10 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई -पुणे -सोलापूर वंदे भारत ट्रेन ही पहिल्यांदा सुरू झाली. त्यावेळी नवोदय विद्यालय तुळजापूर येथील विद्यार्थी, पालक, शिक्षकांची या सफरसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कुमारी तनिष्का मगर या विद्यार्थिनीची निवड झाली होती. यावेळी कु.
तनिष्का मगर या विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेद्वारे कशी निवड झाली. त्यानंतर पुणे ते सोलापूरचा वंदे भारत ट्रेनचा प्रवासातील अनुभव, व्यवस्था, टेकनॉलॉजी, नारी लोकोपायलट याबद्दलचे स्वतःचे अनुभव स्वतःच्या भाषेत लिहून पाठवले होते. ते अनुभव, विचार वाचून मेक इन इंडियासाठी तसेच देशाचा विकास, प्रगतीसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटले. हे विचार वाचून त्यांनी तनिष्का मगर तिला प्रमाणपत्र पाठवून कौतुक व अभिनंदन केले.
उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व विद्यालयाचे चेअरमन डॉ. सचिन ओंबासे यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी पुष्पगुच्छ व नरेंद्र मोदी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. यासाठी विद्यालयाचे शिक्षक चक्रपाणि गोमारे, सुजाता कराड, रामकुमार शुक्ला यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक_ शिक्षक समितीचे सर्व सदस्य यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक करून अभिनंदन केले. आणि भावी जीवनासाठी उज्वल कामना व्यक्त केल्या.