परंडा (प्रतिनिधी) - प्रामाणिकपणे काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍यांना संस्थेची दारे सदैव उघडी  असणार आहेत केवळ त्यांनी आपली दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी विद्यार्थ्यांचे हित जपावे महाविद्यालयात गुणवत्ता चांगल्या पद्धतीने निर्माण करावी असे मत श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. दत्तात्रय मांगले यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात शुभेच्छा देताना व्यक्त केले.ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

प्रा. दत्तात्रय मांगले हे 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा  कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव तर व्यासपीठावर श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे, सचिव संजय निंबाळकर , कनिष्ठ विभागाचे नवनियुक्त पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख, उपप्राचार्य प्रा. डॉ. महेश कुमार माने आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रा. तानाजी फरतडे, प्रा. दीपक हुके, प्रा. उत्तम कोकाटे, प्रा. विजय जाधव, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिव, प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा किरण देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा संभाजी धनवे यांनी केले. तर आभार प्रा डॉ महेश कुमार माने यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top