तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्याची खरीप पिकाची सरासरी 96,455.74 हेक्टर असताना आजपर्यत प्रत्यक्षात 106473.60 हेक्टर क्षेत्रात 110.39 टक्के पेरणी आहे. यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनचे सरासरी 42 हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात 96825 हेक्टर क्षेत्रात 230.54 टके झाली.
तुळजापूर तालुक्यात जवळपास एक महिना पावसाने ओढ दिली. तरीही शेतकर्यांनी पाऊस पडेल या भरवशावर उपलब्ध ओलीवर खरीप पेरणी केली असता शेतकर्यांनी निसर्गावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत निसर्गाने मागील आठवड्यात दमदार बँटींग करुन 217 मिमि पाऊस पडला.
कापुस सुर्यफुल रामतीळ, रागी या पिकाची यंदा शुन्य टक्के पेरणी झाली आहे. सर्वाधिक कमी पेरणी भाताचे क्षेत्र 540 हेक्टर असताना उशीरा पाऊस झाल्याने 1.06 टक्के म्हणजे 00. 30 टक्के पेरणी झाली.
भात (540) 1.06 (00.30) टक्के, ज्वारी (1500) 18.0 (1.20)टक्के, बार्ली (2043.65)29(1.42)टक्के, मका (9751.95) 731 (7.50)टक्के, तुर (16524) 4654 (28.16)टक्के, मुग (5659.95)1259(22.4)टक्के, उडीद (7802.79) 2410 (30.89)टक्के, भुईमुग (1820.62) 88.0 (4.8)टक्के, तीळ (765.69) 2.0 (00.26)टक्के, रामतीळनिगरसीड (208.00) 00 (00) टक्के, सुर्यफुल (240.00) 00 (00)टक्के, सोयाबीन (42000) 96825 (230.54)टक्के, कापुस (70.0) 00 (00)टक्के, इतर डाळी (275.2) 113 (43.93)टक्के.
