उमरगा (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत उमरगा, लोहारा व मुरूम शहरातील विविध विकास कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये उमरगा शहरासाठी 5 कोटी तर मुरुम व लोहारा शहरातील विविध कामांसाठी प्रत्येकी 2.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करणेबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेली होती. त्यानुसार खालीलप्रमाणे कामांसाठी निधी मंजुर झाला आहे.
या निधीतुन उमरगा शहरातील प्रभाग क्र. 1 मध्ये शिंदे गल्ली ते मलंग विद्यालय ते उमरगा नदीकडे जाणारी गटार करणे 50 लक्ष रु., बालाजी तात्या सुरवसे घर ते रविशंकर विद्यामंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 90 लक्ष रु., प्रभाग क्र.1 मध्ये नवीन आरोग्य नगरीत सह्याद्री हॉस्पिटल परिसरात गटार करणे 30 लक्ष रु., प्रभाग क्र. 7 मध्ये राष्ट्रीय महामार्ग ते सचिन पाटील घर रस्ता / गटार करणे 30 लक्ष रु., प्रभाग क्र. 7 मध्ये संतोषी माता मंदिर परिसर व डांगे घर ते व्यंकट गुरव घरापर्यंत रस्ता व गटार करणे 40 लक्ष रु. प्रभाग क्र.10 मध्ये जुने आरोग्य नगरीत देवकर घर ते पाण्याची टाकी पर्यंत रस्ता / गटार करणे 50 लक्ष रु., प्रभाग क्र. 10 मध्ये पतंगे हॉस्पिटलच्या दक्षिण बाजूस व परिसरात गटार करणे 30 लक्ष रु., प्रभाग क्र. 10 मध्ये संदीप चव्हाण घर ते पवार घर ते भारत विद्यालय संरक्षक भिंत लगत ते मुगले शेतापर्यंत गटार करणे 30 लक्ष रु., प्रभाग क्र. 12 मध्ये गणेश नगर येथे गुंजोटी रोड ते महारुद्र स्वामी यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार करणे 70 लक्ष रु., असा एकूण 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर लोहारा शहरातील प्रभाग क्र. 5 मध्ये जेवळी रोड ते कुरेशी कब्रस्तान रस्ता व गटार करणे 20 लक्ष रु., जेवळी रोड ते अनिल रेणके घर रस्ता व गटार करणे 15 लक्ष रु., जुना बाजार रस्ता ते धान्य गोदाम रस्ता 15 लक्ष रु., प्रभाग क्र. 15 मध्ये शेवाळे घर ते मदार सय्यद घर रस्ता करणे 10 लक्ष रु., प्रभाग क्र. 15 मध्ये मोहम्मद शेख ते मुस्ताक शेख घरापर्यंत रस्ता करणे, अनिल गोरे ते शक्कू बागवान घरापर्यंत गटार करणे 15 लक्ष रु., प्रभाग क्र. 3 मध्ये दत्ता कांबळे घर ते भोई घर रस्ता करणे 15 लक्ष रु., सुभाष होनराव घर ते पठाण घर रस्ता करणे 10 लक्ष रु., प्रभाग क्र. 17 मध्ये मुजावर डॉक्टर घर ते शिक्षक पतसंस्था रस्ता करणे 15 लक्ष रु., नाना माळी घर ते कदम शेत रस्ता करणे - 10 लक्ष रु., प्रभाग क्र. 14 मध्ये गफूर शेख घर ते रमेश वाघ घरापर्यंत रस्ता व गटार करणे 25 लक्ष रु., प्रभाग क्र. 2 मध्ये बाबरे घर ते नागराबाई घर दोन्ही बाजूने बंदिस्त गटार करणे 10 लक्ष रु., अशोक शिंदे घर ते रोडगे कंडक्टर घरापर्यंत बंधिस्त गटार करणे 15 लक्ष रु., प्रभाग क्र. 13 मध्ये बंजारा वस्ती ते होनराव शेतापर्यंत रस्ता करणे 25 लक्ष रु., प्रभाग क्र. 12 मध्ये मक्तेदार शेत ते बादुले घर रस्ता व गटार करणे 25 लक्ष रु., प्रभाग क्र. 11 मध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे 25 लक्ष रु. असा एकूण 2.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच मुरूम शहरातील संभाजीनगर (काबरा प्लॉटिंग) मधील न.प. ची खुली जागा सुशोभीकरण करणे 100 लक्ष रु., मुरूम शहरातील महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण व विकसित करणे - 30 लक्ष रु., नगर परिषद मुरूम अग्निशमन केंद्र येथे रस्ता व अनुषंगिक कामे करणे - 90 लक्ष रु., मुरूम शहरातील संभाजीनगर (काबरा प्लॉटिंग) येथे रस्ते व गटारी करणे- 30 लक्ष रु. असा एकुण 2.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
