धाराशिव (प्रतिनिधी)-मणिपूर राज्यात झालेल्या स्त्रियांवरील मानवतेला काळिमा फासणार्‍या देशविघातक कृत्याच्या निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी धाराशिव शहरात रविवारी सकाळी मौन सत्याग्रह आयोजित करण्यात आले आहे. 

मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, सैनिकांवर हल्ले आणि महिला अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर झालेला सामूहिक अत्याचार किळसवाणा आणि संतापजनक आहे. या सगळ्या संतापजनक प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी धाराशिव शहरात मौन सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. शहर आणि परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ठीक 11 वाजता धाराशिव शहरातील शहर पोलीस ठाण्याजवळील हुतात्मा स्मारकाजवळ हे मौन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. भारत मातेच्या लेकीसाठी सत्याचा आग्रह धरण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top