धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीला सुरुवात होऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात जाणीव जागृती निर्माण करण्याच्या अनुषंगाने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दि. 24 जुलै 2023 ते 29 जुलै 2023 या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

या संदर्भातील तयारी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे समन्वयक प्रा. डॉ. जीवन पवार यांनी दिली. या सप्ताहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयाच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टरचे सादरीकरण, ग्रंथ प्रदर्शन, तज्ञ लोकांच्या मुलाखती, यु ट्युब आणि रिल्सच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.


 
Top