तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे नुतन उपमुखमंञी तथा वित्त व नियोजनमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 22 जुलै रोजी श्री तुळजाभवानी मातेस साडी चोळी खण नारळाची ओटी अर्पण करून होमकुंडा समोर महाआरती करण्यात आली तसेच ना. अजित पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशी देवीचरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, जेष्ट नेते गोकुळ शिंदे, महेश चोपदार, कॉंग्रेस मीडिया प्रमुख बबन गावडे, विकी घुगे, अनमोल शिंदे, नितीन रोचकरी, अभय माने, प्रवीण कदम, सुभाष कदम, मनोज माडजे, शशी नवले, समाधान ढोले, विनोद जाधव, मच्छिंद्र शिरसागर, भैरव लांडगे यावेळी उपस्थित होते.
