धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टी जिल्हा कार्यालय येथे आज आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव अजित खोत यांच्या हस्ते धाराशिव नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अॅड. उस्मान युसुफ मोरवे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश घेण्यात आला.
यावेळी आम आदमी पार्टीत महाराष्ट्र राज्य सचिव यांनी उस्मान मोरवे यांना धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी धाराशिव आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे,सचिव मुन्ना शेख,युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे,शहराध्यक्ष बिलाल रजवी,शहर संघटक मुक्तार शेख आदी उपस्थित होते.
