नळदुर्ग (प्रतिनिधी)- जैनमुनी आचार्य प.पु. कामकुमार नंदीजी महाराज यांच्या हत्तेच्या निषेधार्थ दि. 20जुलै रोजी नळदुर्ग येथे अणदुर व नळदुर्ग येथील समस्त जैन समाजाच्या वतीने बसस्थानक ते पोलिस ठाण्यापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरांतील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

दि. 20 जुलै बेळगाव जिल्ह्यातील हिरेकुळी येथे जैनमुनी धर्मगुरू आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज हे विहार करीत असताना कांही समाजकंटकानी त्यांची हत्त्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले.ही घटना संपुर्ण मानव जातीला काळीमा फासणारी आहे.जैन समाज बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध करून देशभरातील जैन समाजाने भारत बंदचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतीसाद म्हणुन दि. जुलै रोजी नळदुर्ग व अणदुर येथील जैन समाज बांधवांनी नळदुर्ग बंदची हाक देण्याबरोबरच मुकमोर्चा काढुन या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

दि. 20 जुलै रोजी पावसाची रीमझीम सुरू असतानाही सकाळी 10 वा. नळदुर्ग व अणदुर येथील जैन समाज बांधवांनी नळदुर्ग बसस्थानकापासुन पोलिस ठाण्यापर्यंत मुकमोर्चा काढला. या मुकमोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती. मुकमोर्चा पोलिस ठाण्यावर आल्यानंतर जैन समाजाच्या वतीने जैनमुनी आचार्य प.पु. श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घृण हत्त्या करणार्‍या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक रियाज पटेल यांना देण्यात आले.


 
Top