धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे कर्तुत्वान, डायनॅमिक, सर्वसामान्य माणसांसाठी अहोरात्र काम करणारे कणखर नेते उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि.22 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून सामाजीक दृष्ट्या उपयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून कोणताही वाजवी व वायफळ खर्च न करता स्त्री रुग्णालय धाराशिव येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करून सदर वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच स्त्री रुग्णालय धाराशिव येथील सर्व स्टाफच्यावतीने अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव यांच्या वतीने ना. अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी आदिशक्ती श्री. तुळजाभवानी देवीच्या चरणी आरती करण्यात आली. तुळजापूर राष्ट्रवादी यांच्या वतीने रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्याचबरोबर धाराशिव शहरा लगत असणार्या मतिमंद निवासी शाळेमध्ये लहान बालकांसाठी फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्रशाला उमरगा येथे उमरगा राष्ट्रवादीच्या वतीने सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे, गोकुळ शिंदे, नंदकुमार गवारे, खलील पठाण, असद खान पठाण, सतीश घोडेराव, बालाजी शिंदे, बबन गावडे, जाकीर शेख, राजाभाऊ जानराव, अप्सरा पठाण, महेश चोपदार, विकी घुगे, डी.के.कांबळे, अनमोल शिंदे, नितीन आबा रोचकरी, अभय माने, प्रवीण कदम, सुभाष कदम, मनोज माडजे, शशी नवले, समाधान ढोले, विनोद जाधव, मच्छिंद्र शिरसागर, प्रफुल्ल पांचाळ, बाळू पांचाळ, आकाश धूरगुडे, रुपेश पाटील,भैरव लांडगे आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी,सहकारी उपस्थित होते.
