सोलापूर (प्रतिनिधी)-धर्मवीर कुमार सुबुकलाल (वरिष्ठ तिकीट निरीक्षक) हे गाड़ी क्र. 17629 पुणे  नांदेड एक्सप्रेसवर ऑन ड्यूटी  तिकीट चेकिंग करीत असतानी बोगी क्र. एस -1  मध्ये वरच्या बर्थ वर झोपलेल्या इसमाला तिकीट  मागीतले  असताना त्याने रेल्वे कर्मचारी आहे असे सांगितले.तेंव्हा तिकीट निरीक्षकांनी त्याला पास, आई -डी मागीतले. तर त्यानी  हुज्जत घातली.  

दौंड कॉर्ड लाइन आल्यावर तो खाली उतरला आणि दगड़ घेऊन आला आणि तिकीट निरीक्षाकाच्या डोक्यात मारून पसार झाला. त्या इसमाची अजून ओळख पटली नाही.

 ही घटना सोबत असलेले चल तिकीट निरीक्षक अंजुम एन. सय्यद यांना कळताच त्यांच्या डोक्यावर प्रथमोपचार करून पट्टी बंधली आणि पुढे अहमदनगर स्थानकवार रेल्वे हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डोक्याची जखम इतकी मोठी होती की आठ टाके लागले आहेत. त्या फुकट्या अज्ञात  प्रवाशा विरोधात  अहमदनगर सिटी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा  करण्यात आला आहे. सर्व प्रवश्यांना विनंती आहे की, प्रवासा दरम्यान उचित तिकिट घेऊनच प्रवास करावा आणि तिकिट निरीक्षकास सहकार्य करावे.


 
Top