उमरगा (प्रतिनिधी)-जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम ई-मेलद्वारे दि. 6 जुलै रोजी दिला आहे. यामुळे आगामी काळात राजकारणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजीनाम्यात म्हटले आहे की, सन 1978 पासून कैलासवासी माजी आमदार भाऊसाहेब बिराजदार यांच्यापासून आजपर्यंत बिराजदार कुटुंबीय 40 वर्षापासून तर मी स्वत: 33 वर्षापासून पवार कुटुंबियांसोबत आहे. सन 1980 ते 1984 या कालावधीमध्ये पक्षांतर करत जवळच्या मंडळीनी साथ सोडली. सोबतच्या सहा मतदारपैकी धाराशिव जिल्ह्यातील बिराजदार खंबीरपणे सोबत होते. मी आजपर्यंतही जिल्हा परिषद सदस्य होतो. भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना अजित पवार यांच्यामुळे पुन्हा जोमात सुरू झाला. मात्र पक्षाच्या विभाजनामुळे कोणती भूमिका घ्यावी, हा प्रश्न असून,विभाजन सामान्य कार्यकर्त्यांसाठी अनाकलनीय आहे. यापुढेही राष्ट्रवादी कॉंग्रेस, पवार कुंटुबियांवर निष्ठा ठेवून जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी कार्य करत राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे.

 
Top