वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील दसमेगाव, पारा, बावी, पिंपळगाव (क), गोलगाव, पारडी, इजोरा, लाखनगाव, दहिफळ, ब्रह्मगाव, कन्हेरी आदी गावातील दलित भूमिहीन आदिवासी यांनी 1985 पासून शासकीय गायरान जमिनी वहीती खाली आणून पिके काढून उदरनिर्वाह भागवत आहेत तरी या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून वाशी तहसीलमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणीव संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये वाशी तालुक्यातील अतिक्रमित गायरान जमिनीचे वस्तुस्थितीचे पंचनामे करावे चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र शासन वन विभागाचे नावे केलेले फेर रद्द करावे, कब्जे वहिवाटी खालील व ताब्यातील गायरान जमिनीचे वाटप करावे, 2023 पर्यंतच्या वहीती गायरान जमिनी पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करून सातबारा द्यावे, खरीप उभ्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश व्हावेत वहीती गायरान जमिनीमधील सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, गायरान धारक कुटुंबाची सुरक्षित करून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यास सहकार्य करावे, गायरान जमिनीत वास्तव व करणार्या कुटुंबाची राहती जागा नावे वर करून त्यांना त्या जागेवर घरकुल बांधून द्यावेत, इत्यादी मागणीची निवेदन वाशीचे प्रभारी नायब तहसीलदार सचिन पाटील व जे. जे. तवले यांना देण्यात आले. यावेळी जाणीव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे, सुभाष गाडे, लाला काळे, सुबराव काळे, नवनाथ शिंदे, बबन शिंदे, भागवत काळे, शैला काळे आदिने दिलेले आहेत. यावेळी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.