तुळजापूर (प्रतिनिधी)- क्षमतेपेक्षा अधिक जनावरे पिकअप मधुन  पिकअपला  सुरतगाव- पिंपळा जाणार्‍या रस्त्यावर पोलिसांनी ताब्यात घेऊन प्राण्यांना निर्दयपणे वागणूक दिल्या प्रकरणी  एकावर गुन्हा दाखल करुन 2 लाख 19 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सुरतगाव-पिंपळा जाणार्‍या रस्त्यावर शुक्रवार दि. 21 जुलै रोजी सांयकाळी सवासहाच्या दरम्यान केली.

या बाबतीत अधिक माहिती अशी की,  आरिफ हुसैन कुरेशी, रा काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी  दि. 21 जुलै रोजी 6.10  वा.सु. सुरतगाव ते पिपळा जाणारे रोडवर पिकअप क्र. एमएच 25 पी 4931 सह दोन जर्शी लहान खोंड, एक गावरान लहान खोंड, एक खिल्लारे खोंड  सह पिकअप वाहन असा एकुण 2 लाख 19 हजार रूपये किंमतीची जनावरेसह पिकअप अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त जनावराची निर्दयतेने बांधून घेवून वाहतुक करत असतांना तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नेणा-या  व्यक्तीविरुध्द प्राण्यांचा छळ कायदा कलम 11 (1) (के) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5, 5(अ), 5 (ब) सह मो.वा.का. 83, 177  अन्वये  तामलवाडी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


 
Top