धाराशिव  (प्रतिनिधी)- 2022 च्या सततच्या  पावसाच्या 13 हजार 600 रुपये व 3 हेक्टरची मर्यादा तसेच 2023 च्या अवकाळी पावसाच्या मदत निधी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मिळावा म्हणून मी व माझ्या संघटनेतर्फे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न करणार होतो तो पोलिसांनी हाणून पाडला. परंतु माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी बांधवांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकार विरूद्ध लढत राहणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले. 

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अन्यथा शासकीय इमारतीवरून उडी मारुन आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे  देण्यात आला होता. शुक्रवार (दि 21) रोजी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकर्‍यांनी सरकारच्या विरूध्द घोषणाबाजी केली. यावेळी उमेश डोके, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ गादेकर, अशोक बनसोडे, मयूर कावळे, शुभम माने, उमेश वाघमारे, काका येडवे,दाऊद आतार, रोहित देसाई, राहूल बोडके, भैय्या गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top