धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय उस्मानाबाद येथे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रस्ताविकामध्ये दुधगावकरांनी ठराव मांडला की धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, शेतकरी,शेतमजूर, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, कामगार शंभर टक्के मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे आहेत, हे हात वरती करून सांगावे म्हटल्यानंतर सर्वांनी हात वरती करून अनुमोदन दिले. याप्रसंगी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राहुल मोटे यांनी हा जिल्हा एक संघ  शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे राहणार अशी ग्वाही दिली. याला अनुमोदन म्हणून सर्व जिल्ह्याचे प्रमुख नेते,पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष सर्व फ्रंटल जिल्हाध्यक्ष,सर्व शहराध्यक्ष यांनी दिले.

     यावेळी या बैठकीसाठी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी आमदार राहुल मोटे, प्रदेश सचिव मसूद शेख,जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, ज्येष्ठ नेते संपतराव डोके, प्रताप सिंह पाटील,महेंद्र धूरगुडे, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन मधुकरराव मोटे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, नितीन बागल,वाजिद पठाण, कादर खान,सतीश एखंडे,हबीब खान पठाण,अनिलदादा शिंदे, मझहर शेरेकर, रोहित बागल, नितीन बिक्कड, तालुकाध्यक्ष संजय पवार,श्याम घोगरे, श्रीधर भवर, हनुमंत पाटोळे, धैर्यशील पाटील, शेखर घोडके, मनीषा पाटील, विशाल शिंगाडे, सतीश घोडेराव, मनोज मुदगल, अमरसिंह देशमुख, रणवीर इंगळे, बाळासाहेब कणसे,  तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शरदचंद्र पवार  राष्ट्रवादी प्रेमी आदींसह आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top