धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.पदमसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमे निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन बोरगाव, ता.तुळजापूर येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात बोरगाव व परिसरातील सर्व वयोगटातील 460 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच आर्चना माने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुने कृ. उ. बाजार समितीचे संचालक सिध्दु कोरे, उपसरपंच लक्ष्मण पाटील, राम सोमवंशी, जेष्ट शिक्षक मोहन माने, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर सुतार, गौतम कांबळे, ग्रा. प. सदस्य वंदना सुतार, राम कलकुट्टे, बाबु सुरवसे, लक्ष्मण काबंळे, राहुल जाधव, कविता काबंळे, विशवंभर साळुंके इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ मयुर पाटील, डॉ. ओम खानापुरे, डॉ.धन्वी मोरे, डॉ.प्रियंका राठोड, डॉ.किष्णप्रिया यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, संदिप खोचरे, व जळकोट आरोग्य केंद्राचे डॉ. ब्रम्हा, माशाळकर मॅडम, व आशा कार्यकर्त्या मुबीना शेख यांनी परिश्रम घेतले.