तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे बिरूदेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बिरूदेव मंदिरात देवाची पुजा करून कार्यक्रमास सुरुवात झाली. दुपारी गावातून ढोल-झांजचया गजरात मिरवणूक काढण्यात आली. दुपारी मंदिरात पारंपारिक पध्दतीने सर्व विधी पार पाडून, इरकल पुजारी यांनी सर्व भक्तांना दर्शन दिले. 

मंदिर कमिटीच्यावतीने भोजनाची सोय करण्यात आली होती. गावापासून मंदिर दूर असून, सुध्दा सर्व आबालवृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले व गावातील इतर भक्तांची गर्दी दिसून आली. यावेळी तानाजी क्षिरसागर, शहाजी सुपनार, शंकर तिगाडे, शंकर क्षिरसागर, बंडू तिगाडे, कैलास क्षिरसागर, किसन लांडगे, महाळापा तिगाडे, नानासाहेब भालेकर, बिरूदेव तिगाडे, नागनाथ क्षिरसागर, रमेश लांडगे, दता तिगाडे, नवनाथ क्षिरसागर, केरापा तिगाडे, दादासाहेब क्षिरसागर, राजेंद्र तिगाडे, राम क्षिरसागर व सर्व समाज बांधव उपस्थित होता.


 
Top