धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा 14 वा वर्धापन दिन दि. 20 जुलै 2023 रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव शहरासह व परिसरातील सर्व शाखांच्या कर्मचार्यांनी एकत्र येत धाराशिव शहरात मोटारसायकल रॅली काढली. याद्वारे बँकेच्या विविध सेवांची विशेषत: कर्ज व ठेव संदर्भातील सर्व योजनांची माहिती लोकापर्यंत पोहोचवण्यात आली.

मराठवाडा ग्रामीण बँक व महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक या दोन बँकांचे एकत्रीकरण होऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेची निर्मिती झाली. बँक शेतकरी, छोटे व्यापारी यांच्यासोबतच गृह कर्ज, वाहन कर्ज, मोठ्या व्यापार्यांसाठी कर्ज, प्रॉपर्टी तारणावर कर्ज, इत्यादी कर्जाच्या विविध सेवा पुरवून आकर्षक व्याजदरात ठेवी स्वीकारत आहे.

यावेळी धाराशिव शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर, शाखा व्यवस्थापक आनंद नगर रणजित मोरे, शाखा व्यवस्थापक सांजा शाखा अविनाश हमने व प्रमुख पाहुण्या म्हणून गायकवाड मॅडम उपस्थित होत्या. सूत्रसंचालन दिलीप गाढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्याणी तमगडगे, सिद्धेश्वर अडसूळ, सायली म्हणकाळे, किरण साळुंके, अभिजित सूर्यवंशी, अण्णासाहेब काकडे तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.


 
Top