तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे असणार्या आराधवाडी भागातुन गावठी कट्यासह तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरील कारवाई तुळजापूर पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी 10 वा केली. त्यास आज तुळजापूर न्यायालयासमोर उभे केले असता त्यास न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
या बाबतीत अधिक महिती अशी की, तिर्थक्षेञ तुळजापूर येथील आराधवाडी हा परिसर श्रीतुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे सोलापूर-धाराशिव बायपास लगत आहे. हा भाग तिर्थक्षेञ तुळजापूरच्या खालचा बाजूस असल्याने येथे अधिक सुरक्षा व्यवस्था नसते. तुळजापूर पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळताच ऐपीआय ज्ञानेश्वर कांबळे आपल्या सोबत पोलिस कर्मचार्यांना घेवुन आरादवाडी गाठली तिथे हॉंटेल मध्ये गावठी कट्यासह बसलेल्या अक्षय गायकवाड याला झडप मारुन ताब्यात घेतले. सदरील कारवाई पोलिस निरक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शन खाली ऐपीय ज्ञानेश्वर कांबळे, पोकॉं. अतुल यादव, पोनि. सांळुके, पोनि. शिरगिरे अदिनी केली. सदरील तरुणाने गावठी कट्टा कशासाठी जवळ बाळगला, तो कुठुन आला हे आरोपीच्या चौकशी अंति स्पष्ट होणार आहे. या पुर्वी तुळजापूर तालुक्यातील कामठा परिसरात तीन जणांना कट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिर्थक्षेञी गावठी कट्टे पोहचविणारे रँकेट? तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सातत्याने युवकांजवळ गावठी कट्टे आढळत आहे. हे तिर्थक्षेञ तुळजापूरच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे गावठी कट्टे येथे पोहचविणार्या रँकेटचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.