धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमे निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन मंगळवारी दि. जुलै रोजी रत्नापूर , ता.कळंब येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात रत्नापूर व परिसरातील सर्व वयोगटातील 510 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ट विश्वस्त अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुने शिवाजी बाराते, मा.जि.प सदस्य मदन बारकुल, रामकिसन कोकाटे, सरपंच सुनील वाघमारे, मा. सरपंच अविनाश जाधवर, मा. सरपंच हनुमान जाधवर, ग्रा.प. सदस्य विकास जाधवर, रमेश जाधवर, पिनु जाधवर, शिवराज बिडवे, रणजीत जाधवर, फुलचंद जाधवर, मच्छिंद्र टेकाळे, चेअरमन डिगा टेकाळे इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ ओंकार वाडुळ, डॉ. अर्थव शिरोडकर, डॉ. अथरी नंदनशेट्टी, डॉ. तनवी वावळ, डॉ.सानिया शेख यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निशिकांत लोकरे, व येरमाळा केंद्राचे कर्मचारी व आशा कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.