धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ठाकरे शिवसेनेचे ध्येय, धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन शिवसेना मजबुत करणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पु. वि. लोकराज्यशी बोलताना सांगितले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहसंपर्कप्रमुखपदी धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुखपदी परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांची तर धाराशिव शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांची नियुक्त झाली आहे. तर लोहार्‍याचे माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. 

एकीकडे राज्यात राजकीय खळबळ माजलेली असताना या सर्व सत्ता नाट्यापासून शिवसेना लांब राहून संघटना मजबुतीकरणावर जोर देत असल्याचे दिसत आहेत. धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी काळात हा गड राखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न चालू असल्याचे पहायला मिळत आहे. अर्थात राज्याप्रमाणे जिल्ह्यात देखील ठाकरे गटाच्या सेनेत पडझड झालेली असतानाही खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 
Top