धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील जत्रा फंक्शन हॉल या ठिकाणी जिल्हास्तरीय कवी संमेलन व सौ चंद्रकला नागेश काकडे हस्तलिखित स्वरांजली या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जिल्ह्याचे आमदार कैलास पाटील तसेच प्राध्यापक सत्तेंद्र राऊत व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई सुधीर पाटील व माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री श्रीमती अश्विनी धाट, डॉक्टर अस्मिता बुरगुटे,विक्रम पाचंगे, सिद्धेश्वर कोळी, विजय काकडे, सिद्धेश्वर खडके, माने व पांडुरंग गर्जे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमांमध्ये आ. कैलास पाटील यांनी ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसा एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो. त्या उक्तीप्रमाणे वहिनी चंद्रकला काकडे यांना नागेश काकडे यांनी कशी प्रेरणा दिली
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वी साठी संयोजक नागेश काकडे, उमेश साळुंखे,दत्ता दाने, वैभव पाटील, शशी दुर्वे, गुलाब कोकाटे, किशोर शिंदे, अमोल माने तसेच पवन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अस्मिता बुरगुटे तर आभार प्रदर्शन नागेश काकडे यांनी मांडले.