धाराशिव (प्रतिनिधी) - येथील कवी, गीतकार, लेखक डी. के. शेख यांच्या  भांडणाचा प्रश्नच कुठं येतो रे या कवितेचा समावेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए., बी.कॉम.,बी.एस्सी, बी.एस.डब्ल्यू, बी.एफ.ए.द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात जून 2023 पासून करण्यात आला आहे. 

यापूर्वीही विद्यापीठीय अभ्यासक्रमात तीन वेळा त्यांच्या कवितांचा समावेश झालेला होता. धाराशिव येथील नगर वाचनालय येथे  कार्यरत असणार्‍या डी.के.शेख यांचे आजपर्यंत 9 काव्यसंग्रह, 3 संपादित ग्रंथ प्रकाशित झालेले असून अनेक गाणी संगीतबद्ध झालेली आहेत. त्यांच्या ’दंगल आणि इतर कविता’ या संग्रहास 9 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले असून या संग्रहाचा साहित्य अकादमी प्राप्त कवी अस्लम मिर्झा यांनी फसाद और दिगर नजमें नावाने उर्दू अनुवाद केलेला आहे. त्यांच्या कविता हिंदी, उर्दू, गुजराती भाषेत अनुवादित झालेल्या आहेत.

 
Top