धाराशिव (प्रतिनिधी)- भविष्यात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू तसेच या रोजगार मेळाव्यानिमित्त जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात या संधीचा फायदा घ्यावा. आपण नवीन उद्योग लवकरच आणू अशी ग्वाही आमदार कैलास पाटील दिली.

मेळाव्याचे उद्घाटन धाराशिव - कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते झाले.कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र शासन मार्फत जागतिक युवा कौशल्य  दिनानिमित्त व शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर  आणि शासकीय आयटीआय  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शासकीय आयटीआय  येथे नुकताच संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यासाठी पुणे, औरंगाबाद, बारामती तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे, केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, प्रकल्प अधिकारी जावळेकर, पांडुरंग मोरे, सोळंके, रिजवान कपूर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रविण औताडे यांनी केले. तर सूत्रसंचालन मनोज चौधरी यांनी केले. 


 
Top