परंडा (प्रतिनिधी) - गेल्या अनेक महिन्यापासून जिल्हाभरात ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असून जुन्या घटनाचा तपास अद्याप लागला नाही. यातच तालुक्यातील ढगपिंपरी येथील एका माजी सैनिकाचा सैन्यात असतानाचे मी तुमच्या रेजिमेंटमध्ये काम करतो. माझे पैसे तुमच्या खात्यावर चुकून जमा झाले असून पैसे परत पाठवा असे म्हणून माजी सैनिकाची सुमारे एक लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणाची घटना घडली आहे.

सदरील घटनेची पोलिसाकडून मिळालेल्या माहिती अशी की, माजी सैनिक सचिन सुग्रीव गरड (रा.ढगपिंपरी ता.परंडा) यांना मी तुमच्या रेजिमेंटमध्ये काम करतो. माझे पैसे तुमच्या खात्यावर चुकून जमा झाले आहेत. माझे पैसे परत पाठवा असे राकेशकुमार असे नाव सांगणार्‍या व्यक्तीने फोन करून सांगितले. की मला पैशांची अत्यंत गरज आहे. आपण सैन्यदलात कश्मीरला एकत्र होतो. असा विश्वास संपादन करून त्यावर विश्वास ठेवून सचिन गरड यांनी रक्कम पाठवली असता त्यानंतर त्या व्यक्तीने पाठवलेला कोड स्कॅन केल्यानंतर अजून एक लाख रुपये रक्कम खात्यावरून डेबिट झाली.असल्याचे दिसून आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन गरड यांनी परंडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अज्ञातावर सायबर क्राईम कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अशा घटनाची जिल्ह्यातील सायबर क्राईम यांनी तात्काळ दखल घेऊन आज्ञात भामट्यांनचा शोध लावावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.


 
Top