धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. त्यांच्या निषेधार्थ धाराशिव तालु्नयातील तडवळा येथे बंद पाळण्यात आला. यावेळी सुरेश पाटील यांचा निषेध ही करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुरेश पाटील यांचा गट रस्त्यावर उतरल्याने बंदच्या काळात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस विभागाने योग्य पध्दतीने हाताळून तणावपूर्ण शांतता प्रस्तापित केली.
मागील चार दिवसा खाली शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जाऊन नाटकी मुजरा घालीत महाराज आजपर्यंत जिल्ह्याचे विकास केला नाही. शेतकर्यांच्या पिक विम्याचे व अतिवृष्टी गारपिटीचे पैसे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन देखील अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. तसेच दूध उत्पादकांच्या दुधाला भाव देखील दिला जात नसल्यामुळे त्यांच्यावर तलवार चालवा असे नाटक केले होते. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून कधी उतरतील ? त्यांनी केव्हा तलवार चालवावी ? असे उत्तर दिले होते. मात्र मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असा अपप्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे मी ते शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो असे सुरेश पाटील यांनी सांगितले.