धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात डोंगराचा भाग जास्त असल्यामुळे वाढते तापमान जिल्ह्यात असते. त्यामुळे आपण सर्वजण मिळून वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल संभाळू असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. 

जिल्हा पोलीस दल आणि कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्ट, तुळजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने भातंब्री आणि रायखेल डोंगरमाळावर 2500 वृक्ष लागवड करण्यात आले. वड, पिंपळ, लिंब, चिंच, सिताफल, गुलमोहर, पांगीरा, बांबू, बदाम, अशा समाज उपयोगी एकुण वीस प्रजातीची झाडे लावण्यात आली. 

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, श्रीमती महिमा माथुर कुलकर्णी सामाजिक कार्यकर्त्या तथा पर्यावरण तज्ञ, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी गणेश चादरे, कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे, तुळजापूर पोलीस विभागातून पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, मुंडे, चास्कर, पोलीस उपनिरीक्षक पवार, यादव, राउत, फुलसुंदर, सागर, माळी, जाधवर मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमात बोलताना महिमा माथुर कुलकर्णी म्हणाल्या की.  निसर्ग हा मानवाशी जोडलेला आहे. मानव व निसर्ग एकमेकास पुरक आहेत. असे सांगून मुलांनी वृक्षारोपनामध्ये भाग घेतल्यामुळे त्यांनी आंनद व्य्नत केला.

तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बसून राहिल्यामुळे शरिरातील साखर वाढते. डायबेटीज होतो. डायबेटीजवर आयुर्वेदमधील वृक्ष चांगले प्रकारे काम करू शकतात. काम करणार्‍या व्य्नतीला कधीही डायबेटीज होत नाही. त्यामुळे आयुर्वेदामध्ये उपयोगी असलेले झाडे लावण्यावरही भर द्यावा असे आवाहन केले.

 वृक्षारोपणासाठी भातंब्री गावाचे ग्राम पंचायत, इंदिरा कन्या हायस्कुल, मंगरुळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायखेल, यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. सुत्रसंचालन मनोहर दावणे यांनी केले. तर कार्यक्श्रम यशस्वी  होण्यासाठी ज्ञानेश्वर बनसोडे, स्नेहल पाटील, प्रदीप कांबळे, सोमनाथ लोहार, गंगाताई ननवरे, रवी भगत, अजित बनसोडे, राकेश जिटीथोर यांनी परिश्रम घेतले.


 
Top