धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या बी फार्मसी विभागाची नुकतीच पहिली बॅच उत्तीर्ण होत असून या बॅचने पहिल्याच प्रयत्नात नवनवीन विक्रम केले आहेत. यामध्ये नुकताच जी पॅट( ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूट टेस्ट) या परीक्षेचा निकाल लागला असून या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये तेरणाच्या बी. फार्मसी च्या पहिल्याच बॅचचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
या सत्कार समारंभासाठी तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, बी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख डॉ.नागेश तौर तसेच स्पर्धा परीक्षेचे समन्वयक प्रा.काझी अबुसूफियान व विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या जीपॅट परीक्षेमधून राहुल शिंदे (1674), देवर्षी दीक्षित (3815) आणि किरण गायकवाड (52806) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश मिळविले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांना तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील तसेच विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.