धाराशिव (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टी धाराशिवच्या वतीने आपचे महाराष्ट्र सचीव अँड. अजीत खोत यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मणीपुर येथे महिलावर झालेले अत्याचार याचा तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रातील भाजप सरकार व मनीपूर सरकार यांचा निषेध करण्यात आला. घोषणा देण्यात आल्या.
त्वरीत दोषीला अटक करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी आम आदमी पार्टी वतीने करण्यात आली. मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे. आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी करावी. या निंदनीय घटनेचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सदस्य अजित खोत, जिल्हा संयोजक राहुल माकोडे, जिल्हा सचीव मुन्ना शेख, मिडिया प्रमुख प्रा. चांद शेख, सहसचीव अभिजीत देवकुळे, शहराध्यक्ष बीलाल रजवी, उपाध्यक्ष संजय दनाने, संघटक मुख्तारभाई शहाजीराव व आपचे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत
