टाकळी (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील टाकळी(बें) येथील जेष्ठ नागरिक, प्रामाणिक व प्रगतशील शेतकरी विश्वंभर सिताराम सोनटक्के (वय ) यांचे आज (दि.)पहाटे  वाजून  मिनिटाला वृद्धपकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले.

कोरोना सारख्या महामारीमध्ये 22 इतका स्कोर असताना सलग 27 दिवस धाराशिव मधील सरकारी दवाखान्यामध्ये कोरोनावर मात केली होती. तेव्हा त्यांचे धैर्य आणि निर्भीडपणा पाहून दवाखान्यातील डॉक्टर सह अनेक नागरिक अचंबीत झाले होते.  तेव्हा दवाखान्यातील इतर रुग्णांनी सोनटक्के यांच्या कडे पाहून धीर आणि जगण्याची प्रेरणा घेतली होती.  

तेव्हा अनेक वृत्तपत्रा मध्ये 94 वय असणार्‍या आजोबांची कोरोनावर मात’ या मथळ्याखाली  बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ही बातमी वाचून अनेक रुग्णाची व जिल्ह्यातील नागरिकांचे मनोबल वाढून कोरोनाबाबतची भीती कमी झाली होती, मात्र आज पहाटे कावीळ सारख्या दुर्धर आजाराला बळी पडले आणि त्यांची प्राणज्योत मावळली. विश्वंभर सोनटक्के हे राजर्षी शाहू पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन भारत सोनटक्के यांचे चुलते तर पत्रकार प्रशांत सोनटक्के यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, तीन मुली, सुना, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे. 


 
Top