धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालु्नयातील कौडगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या अनुषंगाने मूलभूत सुविधा निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यासह प्रकल्पाचा मास्टर प्लॅन (विस्तृत परिपुर्ण आराखडा) तयार करण्याच्या सूचना उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असलेला टेक्निकल टेक्सटाईल पार्क कौडगाव एमआयडीसी मध्ये उभारण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून सातत्याने केली जात होती. या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी धाराशिवला एमआयडीसीच्या माध्यमातुन टेक्नीकल टेक्सटाईल पार्क उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या बाबतचा आढावा घेण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरुन नु्नतीच उद्योग मंत्र्यांनी बैठक घेतली.

 इतर वस्त्रनिर्मिती उद्योगापेक्षा तांत्रिक वस्त्र (टेक्निकल टेक्सटाईल) उत्पादनाला जगभर अधिकचा वाव आहे. उस्मानाबाद सारख्या आकांक्षित जिल्ह्यात या प्रकारचा उद्योग उभारल्यास 10 हजार रोजगार निर्मीतीसह जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कायापालट करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे.

यावेळी प्रधान सचिव (उद्योग) मंत्रालय, मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि.म.मुंबई,  सह मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔविम,  सह सचिव उद्योग विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔविम, मुख्य अभियंता (मुख्यालय) मऔविम, महाव्यवस्थापक (भूमी) मऔविम, प्रादेशिक अधिकारी, मऔविम, लातूर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 


 
Top