परंडा (प्रतिनिधी) - भूम येथील पीडित मयत फय्याज दाऊद पठाण यांस मारहाण करीत धमकी दिल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने या प्रकरणातील मुख्यतः गुंड प्रवृत्तीचे आरोपी सोबत इतर मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल होऊनही बराच कालावधी झाला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी परंडा येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

सर्व आरोपी अद्यापपर्यंत मोकाट असल्याने हे प्रशासनाचे अपयश मानले जात आहे. याबद्दल समाजात रोष वाढत असल्याने सदर मयत फय्याज दाऊद पठाण व त्यांच्या कुटूंबावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने आज रोजी परंडा शहरातील समस्त नागरिक व तालुक्यातील नागरिकांच्यावतीने सदर प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर ’मोक्का’ या कलमा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी आशयाचे निवेदन तहसीलदार परंडा यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली. यावेळी परंडा शहरातील तसेच तालुक्यातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top