तुळजापूर (प्रतिनिधी) - हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कार्य उभा महाराष्ट्र कधी विसरणार नाही,केवळ नाईक साहेब मुळे बंजारा समाज शिक्षित झाला असून त्यामुळे समाज प्रगती करू शकला त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीने पुढे नेले पाहिजे.असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना केले. 

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील वसंत नगर येथे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी चव्हाण बोलत होते.प्रारंभी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बंजारा महिलानी पारंपारिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

तर येथील बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून जयंती उत्सवात व रॅलीत सहभाग नोंदवल्याबद्दल शेकडो महिलांना येथील समाज सेवक तथा जयंती उत्सव कमिटीचे सुरेश काशिनाथ राठोड यांनी प्रोत्साहन पर काही रोख रक्कम, पारितोषिक देऊन सन्मान केला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, वसंतराव नाईक जयंती कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, कोषाध्यक्ष सुरेश काशिनाथ राठोड, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, माजी नगरसेवक निरंजन राठोड,हरिष् जाधव, वैभव जाधव, संजय राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष विशाल जाधव, तांड्याचे नाईक फुलचंद राठोड, कारभारी विनायक जाधव, माजी नगरसेवका छमाबाई राठोड, कैलास चव्हाण, मोतीराम राठोड, चंद्रकांत राठोड, रवि राठोड,दता राठोड, मोतीराम पवार, चांगदेव चव्हाण, माजी नगरसेविका सुमन जाधव, किसन राठोड, पत्रकार सतिश राठोड, अजित चव्हाण यांच्या सह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top