धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील रामनगर येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय केंद्र येथे ब्रह्माकुमारी मीरा बहेनजी लिखीत ’जीवन मर्म’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  शिवसेना आ. कैलास पाटील, जिपचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, पत्रकार धनंजय रणदिवे, सोलापूर क्षेत्राच्या ब्रह्माकुमारी केंद्र संचालिका कुमारी सोमप्रभा बहेनजी, बार्शी येथील संचालिका संगिता बहेनजी, पंढरपूरच्या संचालिका उज्वला बहेनजी, धाराशिव सेवा केंद्र संचालिका ज्योती बहेनजी, कृष्णा बहेनजी, माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील, प्रा. बोराडे, ज्योती बहेनजी, कृष्णा बहेनजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वडगाव येथील ग्रामस्थ, धाराशिव ब्रह्माकुमारी केंद्रातील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top