धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील सांजा रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत 60 लाख रुपयांचा खर्च करून चक्क उधळपट्टी करण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यामुळे दररोजचा अपघात होत असल्यामुळे हा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावर खर्च केलेली रक्कम नेमकी कोणाच्या घशात घातले अशी चर्चा नागरिकांतून होऊ लागली आहे.
धाराशिव शहरातील सांजा रोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर असलेल्या उतारावर व पाणी वाहून जाणार्या छोट्याशा जमीनस्तरीय पुलावरील रस्ता खराब झाल्यामुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. गेल्या वर्षापासून या रस्त्याचे म्हणजेच केवळ 60 मीटर अंतराचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम दर्जेदार होत नसल्यामुळे पुढे काम तर मागे रस्ता उखडून धूळधाण अशी अवस्था होत आहे. या रस्त्यावर औसा मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक केली जात असल्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा बनला आहे. मात्र अशा वर्दळीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रस्ता बनविणे बांधकाम विभागाचे आद्य कर्तव्य आहे.
मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराला मूक सहमती देऊन याकडे पूर्णपणे डोळे झाक केली जात असल्यामुळे हा रस्ता रस्ता वाटसरु, वाहन, वाहनधारक व प्रवाशांसाठी अपघाताचे प्रवण क्षेत्र बनले व बनत चालले आहे. या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे शासनाचे आजपर्यंत जवळपास केवळ 60 मीटर लांबीच्या रस्त्यावर चक्क 60 लाख रुपयांचा चुराडा केला आहे. हे काम करताना कॉलिटी कंट्रोल म्हणून ज्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपी होती त्यांनी नेमका कशाचा कंट्रोल केला असा प्रश्न या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनधारक व वाहनचालक प्रवाशांना पडलेला पडला आहे. हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त न केल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांमधून केली जाऊ लागली आहे.