तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील लातुर रस्त्यावर दहा वर्षापुर्वी उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकांची इमारत प्रवाशांसाठी धोकादायक बनली आहे. विशेष म्हणजे या नव्या बसस्थानकामधील छताचे प्लास्टर व सिलींग प्लेट पडत असल्यामुळे कधी कोणता प्रवाशी जखमी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्य्नत केला जात आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील जुने बसस्थानक 53 वर्षा पुर्वी बांधली होते. ते काम आजही मजुबत आहे. पण 6 जुलै 2013 रोजी उदघाटन करण्यात आलेल्या नव्या बसस्थानकाचा भिंतीला दहा वर्षात तडे गेले असुन स्लँबचे प्लास्टर पडत आहे. तसेच सिलींग या प्लेट दिवसेंदिवस पडत आहेत.तसेच प्लँटफॉंर्मचे फरशीचे कठडे कट होवुन पडत आहेत.
भिंतीला लावलेल्या स्टाईल गळुन पडत आहे, सध्या जुने बसस्थानक नव्या बांधकामासाठी पाडल्याने या बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड चोवीस तास वर्दळ असते. स्टँडच्या वरच्या भागाची प्लँस्टर प्लेटो कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने व त्या केव्हाही पडण्याची शक्यता असल्याने याचा फटका प्रवाशांना कधीपण बसू शकतो.
सध्या मुखमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते आहे. तरीही तिर्थक्षेञ तुळजापूर येथील नव्याने बांधण्यात आलेले बसस्थानक इमारत धोकादायक असताना परिवहन महामंडळ याची दखल घेत नाही. प्रवाशाचे डोके फुटल्यावर दखल घेतली जाणार का? असा सवाल केला जात आहे. सध्या या बसस्थानकात जाताना प्रवाशाना जीव मुठीत घेवुन वावरावे लागत आहे. सदरील बसस्थानकाला येथील व्यापारी वझे यांनी जागा दान दिली होती व हे बांधकाम बीओटी तत्त्वावर केले आहे. फुकट जागा देवुन ही निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने या प्रकरणी संबंधित अधिकारी कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी आगार प्रमुख रामचंद्र शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अहवाल येताच काम तात्काळ केले जाईल.-चेतना खिरवाडकर
आगार प्रमुखांनी आम्हाला या बाबतीत अहवाल देताच हे काम करुन घेतले जाईल अशी प्रतिक्रिया एस. टी. विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.