धाराशिव (प्रतिनिधी)-जी.पॅट.2023 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर .पी .औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाततील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जी. पॅट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून एम. फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. तसेच ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळते.

श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित आर. पी .औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय आळणी, गड पाटी येथील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिंदे कृष्णा 96.24  मगर ऋतुजा  95.03  घूगरे मोनाली 90.38 मगर पूजा 91.99 कांबळे मिताली 82.38 हे सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.

जी. पॅट परीक्षेची विद्यार्थ्याकडून तयारी करून घेण्यासाठी वर्षभर औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील ख्यातनाम प्राध्यापकाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षकांनी वर्षभर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जी. पॅट परीक्षेचे विशेष मार्गदर्शन केले व परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासक्रम शिकवण्यात आला. अध्यापकांनी आपल्या विषयाच्या प्रश्नपत्रिका संच तयार करून विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले.तसेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अनुषंगाने विशेष उपक्रम राबविले जातात.व्यक्तिमत्व विकास, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषद, भित्तिपत्रिका स्पर्धा, विविध विषयावरील परिसंवाद, क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातात. संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य, अध्यापक विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रात ठसा उमटण्यासाठी प्रेरित करत असतात. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी सर,तसेच व्ही.के पाटील शैक्षणिक संकुलन मधील  

सर्व प्राचार्य व प्राध्यापक  वृंद व इतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


 
Top