तुळजापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितपवार गटाचे  नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे  मुंबईहुन  गुरुवार दि. 20 रोजी येवुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन जिल्हाअध्यक्ष पदाचा पदभार स्विकारण्यासाठी धाराशिव येथे रवाना झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व आ. निलेश लंके मिञ मंडळाच्यावतीने   महेंद्र धुरगुडे यांचा देविची कवड्याची माळ घालुन, फेटा बांधुन श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेश चोपदार, नितीन रोचकरी, शशी नवले, मनोज माडज,े अमोल शिंदे, विकी घुगे, समाधान ढोले, विनोद जाधव, आ. निलैश लंके मिञमंडळ जिल्हाध्यक्ष  प्रविण  कदम  यांनी महेंद धुरगुडे यांचा सत्कार केला. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मच्छिंद्र कांबळे सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

 
Top