धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील कार्यालयीन प्रबंधक दिलीप लोकरे, प्रा.डॉ.सौ.अलका इनामदार, प्रा. बालाजी नगरे, प्रा.माधव उगिले, डॉ. स्वाती शीलवंत आणि सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top