धाराशिव (प्रतिनिधी)- परंपरागत अभ्यासक्रमांकडील विद्यार्थ्यांचा ओढा हळूहळू कमी होत असून आगामीकाळात कौशल्यावर आधारित शिक्षणालाच भवितव्य आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी केले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील  व्यस्थापनशास्त्र विभाग व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रियल ट्रेड अँड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद उप-परिसरामध्ये एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले.  सदर चर्चासत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाठ यांनी केले.  या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान साखळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमांमध्ये विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता  डॉ. भालचंद्र वायकर,  डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे,डॉ.प्रशांत अमृतकर, उपपरिसर संचालक डॉ. डी. के. गायकवाड, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून बीएसपीपी प्रोग्राम हा विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र याचा दुवा म्हणून काम करेल असा विश्वास व्यक्त केला.  तसेच  बीएसपीपी प्रोग्राम  मार्फत ग्रामीण भागामध्ये देखील औद्योगिक प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात सहभागी होतील असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमांमध्ये विविध महाविद्यालयाकडून सामंजस्य करार करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले. अशा स्वरूपाचे कार्यक्रम  रोजगार वाढ आणि कौशल्य विकास होण्यासाठी मदतीचे ठरणार आहेत असे मत सहभागी प्रतिनिधी मार्फत व्यक्त करण्यात आले.                   

या उपक्रमामार्फत शैक्षणिक आणि औद्योगिक सामंजस्य करारा बाबत अधिक माहिती डॉ. आसावरी फडतरे, विभागीय समन्वयक डीएसपीपी प्रोग्राम यांच्यामार्फत देण्यात आली.  या चर्चासत्रासाठी जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी,  आयक्यूएसी समन्वयक,  महाविद्यालय प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी  मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.  लघु उद्योग केंद्राचे  श्री संजय देशमाने  तसेच विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी केले तर, तांत्रिक सत्र समन्वयक श्री सचिन  बसैये  यांनी पाहुण्याचा परिचय  दिला. श्री शितलनाथ एखंडे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यापीठ उप-परिसरामधील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी,  विद्यार्थी उपस्थित होते. सदर चर्चा सत्रासाठी 200 पेक्षा जास्त नोंदणी करण्यात आलेली होती तसेच सहभागींना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आले.

 
Top