परंडा (प्रतिनिधी) - सातबारावर नोंद घेण्यासाठी 22 हजार 500  रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी तालुक्यातील आनाळा येथील तलाठ्यावर अंबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

महेश मुकादम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी आनाळा सज्जा तलाठी यांच्याकडे नावनोंद करण्यासाठी अर्ज दिला होता. सातबारावर नोंद करून फेरफार देण्यासाठी तलाठी महेश मुकादम यांनी  सुमारे 22 हजार 500 रूपयांची लाच मागितली. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 22 जून रोजी सापळा रचला असता आरोपीला संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबी पोलीस स्टेशन येथे तलाठी महेश मुकादम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान लोकसेवकांकडून लाचेची मागणी होत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.


 
Top