परंडा (प्रतिनिधी)-परंडा तालुक्यात मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यां समवेत भाजपा प्रदेश मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दि. 22 जून रोजी संवाद साधून स्नेह भोजन केले. 

परंडा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले डोमगाव येथील कल्याण स्वामी मठ येथे आयोजित या स्नेह भोजनासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भाजी-भाकरीचा डबा आणला होता. यावेळी मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामांबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्यातील सर्व जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


 
Top