तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील आपसिंगा काक्रंबा या गावास जलजीवन योजनेतुन रामदरा तलावातुन पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे. पण ती खर्चिक व भविष्यात अयशस्वी ठरणारी असल्याने या गावांना जवळील तलावातुन पाणीपुरवठा योजना राबवावी अशी सुचना माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी फोन वरुन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व अधिक्षक अभियंता गवाणकर  लातूर  यांना केली असता यात आपण  चौकशी करुन योग्य तो निर्णय घेवु असे मंञी गुलाबराव पाटील व अधीक्षक अभियंता गवाणकर यांनी चव्हाण यांना सांगितले.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व आपसिंगा गावांना पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन योजनेतुन  गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या  रामदरा तलावातुन  ही योजने राबवली जात आहे 

त्या ऐवजी अपसिंगा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कामठा व काक्रंबा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचुंदा तलावातुन ही योजना राबविण्याची मागणी ग्रामस्था मधुन होत असताना अधिकारी माञं खर्चिक व भविष्यात ञासदायक ठरणारी योजना राबवत असल्याचा पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी माजी मंञी आ मधुकर चव्हाण यांची भेट घेऊन माहिती देताच माजी मंञी  मधुकर चव्हाण यांनी थेट पाणीपुरवठा मंञी गुलाबराव पाटील व आधिक्षक अभियंता गवाणकर लातूर यांना फोनवरून सदरील योजना ही जवळच्या पाणी स्त्रोत्रातून  राबवावी.  कारण लांबचे स्ञोञ खर्चिक असुन रामदरा तलावातील पाणी शेतीसाठी 85 टक्के व बोरी धरणातील पाणी संपलेतर तुळजापूर शहराला यातील पंधरा टक्के देण्याचे नियोजन आहे. पण सध्याच्या योजनेमुळे शेतीच्या पाण्यावर डल्ला मारला जाणार आहे असे शेवटी म्हणाले.

 यावेळी एमजीपी उपअभियंता ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा जळकोटचे सरपंच अशोक पाटील, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, माजी जि.प. सदस्य दिलीप सोमवंशी  अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख, दिपक सोनवणे,नरसिंग पाटील, प्रा. राम गोरे, अहमद काझी उपस्थितीत होते.


 
Top