परंडा (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बुध्दीवान लटके यांना मारहाण करणार्‍या आरोपी विरूद्ध लटके यांच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करावी अन्यथा दि. 15 जून रोजी परंडा शहर बंद करु असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

दि. 12 जून रोजी तहसिलदार व परंडा पोलिस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुध्दीवान लटके हे पंचायत समिती कार्यालयाजवळ कामानिमित्त थांबले होते. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे बॉडी गार्ड व इतर तीन अनोळखी व्यक्तीनी राजकीय द्वेषा पोटी माजी आमदार यांचे कट्टर सर्मथक बुद्धीवान लटके यांना मारहाण करुन त्यांच्या खिश्यातील रोख रक्कम व सोन्याची चैन तोडून घेतली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी परंडा पोलिस फिर्यादीच्या म्हणण्या नुसार गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत असुन पोलिसावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सावंत यांचा दबाव असल्याचा आरोप केला आहे. दि. 15 रोजी पर्यंत गुन्हा दाखल करून न घेतल्यास परंडा बंदचा इशारा दिला आहे. निवेदनावर महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 
Top