धाराशिव (प्रतिनिधी)-दिल्ली येथे जंतरमंतरवर महिला पैलवानांनी सुरू केलेले अत्याचारविरोधी आंदोलन पोलिसी बळाच्या जोरावर चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केल्याच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी खेळाडूसोबत या उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मंगळवारी (दि.13) सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला खेळाडूंसोबत झालेली ही घटना निंदणीय असून यापुढे महिला खेळाडूंसोबत गैरप्रकार झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या फौजीयाताई खान यांच्या आदेशानुसार व मा.जयंत पाटील, मा.विद्याताई चव्हाण, मा.आशाताई मिरगे व मा.वैशालीताई मोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, खेळाडू सहभागी झाल्या होत्या.


 
Top